आलिया भट्टचा ‘तो’ ड्रेस फक्त चार हजार रुपयांचा?

0

बॉलिवूड स्टार्स नेहमीच प्रसिद्ध डिझायनरने डिझाइन केलेले ड्रेस परिधान करून पार्ट्यांमध्ये हजेरी लावत असतात.

काही दिवसांपूर्वीच अंबानी परिवाराकडून एका मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट हिचाही समावेश होता.

मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, पार्टीत आलियाने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत खूपच नाममात्र होती. होय, आलियाने केवळ चार हजार रुपयांचा स्कर्ट आणि टॅण्क टॉप घातला होता.

आलियाने परिधान केलेला हा स्कर्ट मल्टी कलरचा होता. या लॅगकट स्कर्टसोबत आलियाने ब्लॅक कलरचा टॅण्क टॉप परिधान केला होता. जेव्हा आलियाची पार्टीत एंट्री झाली तेव्हा तिचा हा ड्रेस बघून कोणालाही तो स्वस्त असेल याबाबतचा अंदाज आला नाही. कारण या ड्रेसमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. पार्टीत येताच तिच्यात आणि अभिनेत्री कॅटरिना कैफमध्ये गप्पा रंगल्या. दोघी बराच काळ एकमेकींशी बोलत होत्या.

आलिया या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. परंतु आता तिने परिधान केलेला ड्रेस स्वस्त असल्याचे समोर आल्यानंतर एकच चर्चा रंगत आहे.

LEAVE A REPLY

*