Type to search

क्रीडा धुळे

आर.सी.पटेल संकुलाच्या 18 खेळाडूंची राज्यस्तरावरील स्पर्धांसाठी निवड

Share

शिरपूर । शिरपूर आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या 18 खेळाडूंची विविध मैदानी स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर निवड झाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

धुळे अ‍ॅथलेटीक्स असोसिएशनतर्फे दि.7 जुलै रोजी क्रीडा संकुल धुळे येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणी (ज्युनिअर गट) घेण्यात आली. या चाचणी स्पर्धेत आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या 30 मुलामुलींनी अ‍ॅथलेटीक्स मध्ये सहभाग नोंदवला. त्यापैकी 18 खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने त्यांची राज्यस्तरावर निवड झाली.

14 वर्षे आतील मुले-मुली हर्षदा शिंपी 100 मीटर धावणे प्रथम (एच. आर. पटेल कन्या विद्यालय शिरपूर), शकीला वसावे 600 मीटर धावणे प्रथम (एच.आर. पटेल कन्या विद्यालय शिरपूर), आशिष मोरे 100 मीटर धावणे प्रथम (आर.सी.पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आदर्श नगर), सुदाम पावरा 600 मीटर धावणे द्वितीय (आर. सी. पटेल आश्रम शाळा).

16 वर्षे आतील मुले-मुली – पूर्वांजली राजपूत 400 मीटर धावणे प्रथम (आर.सी.पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आदर्श नगर), अनुष्का पाटील 400 मीटर धावणे तृतीय (एच.आर.पटेल कन्या विद्यालय शिरपूर), हिमांशू चौधरी 400 मीटर धावणे द्वितीय (आर.सी.पटेल विद्यालय शिरपूर), अनिल पावरा 400 मीटर धावणे प्रथम (आर.सी. पटेल विद्यालय खर्दे बु.), वेदांत देसले 100 मीटर, 200 मीटर द्वितीय (ए. आर. पटेल सीबीएसई स्कूल शिरपूर), राकेश पावरा 800 मीटर, 2 कि.मी. धावणे द्वितीय (आर.सी.पटेल खर्दे बु.).

20 वर्षे खालील मुले-मुली- राहुल पवार 100 मीटर द्वितीय (आर.सी.पटेल ज्युनियर कॉलेज शिरपूर), अश्विनी चौधरी 5 किलोमीटर प्रथम (आर.सी.पटेल सिनिअर कॉलेज), सर्जन पावरा 4 बाय 400 मीटर रिले प्रथम (आर.सी.पटेल ज्युनिअर कॉलेज), रमेश पवार 4 बाय 400 मीटर रिले प्रथम ज्युनिअर कॉलेज, मनोहर कोळी 200, 400, 4 बाय 400 मीटर रिले प्रथम (आर.सी.पटेल सिनिअर कॉलेज शिरपूर), चेतन पवार 4 बाय 400 मीटर रिले प्रथम (आर.सी.पटेल सिनिअर कॉलेज शिरपूर), गोविंद कलाल 4 बाय 100, 4 बाय 200 मीटर द्वितीय (आय.एम.आर.डी. कॉलेज शिरपूर), गितेश वळवी 4 बाय 100 रिले प्रथम (आर.सी.पटेल ज्युनिअर कॉलेज).

खुला गट पुरुष- नारायण पावरा 1500 मीटर धावणे उपांत्य फेरी 5 वा, शहाबाज बागवान 400 मीटर अडथळे शर्यत उपांत्य फेरी. 18 व 20 वयोगट मुलामुलींची सांगली येथे 10 व 11 ऑगस्ट रोजी होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली असून 14 व 16 गटातील मुलामुलींची रत्नागिरी येथे 17 व 18 ऑगस्ट रोजी होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली. खुला गट पुरुष निवड झालेले मुंबई ला होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली. सर्व खेळाडूंना संस्थेचे कोच सुभाष पावरा यांचे मागदर्शन लाभले.

सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, वित्त अधिकारी नाटूसिंग गिरासे, क्रीडा संचालक प्रितेश पटेल, फिरोज काझी, जाकीर शेख, सीईओ डॉ.उमेश शर्मा, सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील, प्राचार्य पी.व्ही. पाटील, प्राचार्य आर.बी.पाटील, आयएमआरडी संचालिका डॉ.वैशाली पाटील, प्राचार्य व्ही.आर.सुतार, प्राचार्य रवि बेलाडकर, प्राचार्य एच.के.कोळी, सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक यांनी कौतुक केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!