आर.सी.पटेलच्या 17 शाखांचा 100 टक्के निकाल

0
शिरपूर । दि.13 । प्रतिनिधी-दहावीच्या निकालात शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाने आपल्यायशाची उज्ज्वल परंपराकायम राखली असून संस्थेच्या 17 शाखांचे निकाल 100टक्के लागले आहेत.
संस्थेच्या 1655 पैकी 1651 विद्यार्थीउत्तीर्ण झाले असून संस्थेचा निकाल 99.76 टक्के लागला.1279 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, 344 प्रथम श्रेणीत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.

पियूष सतिष महाजन या विद्यार्थ्याने 99.20 टक्के गुण मिळवून शिरपूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेतून 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 234 विद्यार्थी आहेत. संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचेउपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, सर्व संचालक, सीईओ डॉ.उमेश शर्मा, सर्व प्राचार्य यांनी सर्वयशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

 

LEAVE A REPLY

*