आर्थिक मदतीनंतर अंत्यसंस्कार

0

जळगाव /शिरसोलीजवळ असलेल्या शामाफायर फटाके फॅक्टरीमध्ये स्फोट होवुन दोन कामगार जागीच ठार झाले होते.

मयतांच्या नातेवाईकांनी जोपर्यर्ंत आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतले नाही.

दरम्यान आर्थिक मदत मिळाल्यानंतर शोकाकूल वातावरणात दोघांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाचोरा रस्त्याने असलेल्या शामाफायर वर्क्स इंडस्ट्रीजसमध्ये स्फोट झाला होता. भिषण स्फोटात राजू उर्फ राजेंद्र तायडे, हेमंत जयस्वाल यांचा जागीच मृत्यू झाला.

दोघांच्या मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी 12 वाजेच्या सुमारास नातेवाईकांना दोघांचे मृतदेह ताब्यात देण्यात आले.
शामाफायर वसाहतमध्ये तणाव
राजु व हेमंत या दोघांचे मृतदेह घेतल्यानंतर नातेवाईक शामाफायर वसाहतमध्ये आले.

याठिकाणी कंपनी चालकांनी आर्थिक मदत द्यावी, यासाठी मयताच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला.

यामूळे सुमारे दीड तास गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सपोनि सचिन बागूल, खंडागळे, पोहेकॉ बाळकृष्ण पाटील यांच्यासह कर्मचारी व दंगा नियंत्रक पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

 

LEAVE A REPLY

*