Type to search

जळगाव

आर्टिस्ट शिवम हुजूरबाजार यांचे मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत 22 रोजी चित्रप्रदर्शन

Share

जळगाव । जळगावातील सुप्रसिध्द आर्टीस्ट शिवम संजीव हुजूरबाजार यांचे अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग या प्रकारच्या चित्रप्रदर्शनास जगप्रसिध्द अशा मुंबईच्या जहांगिर आर्ट गॅलरीने आपले दालन खुले केले आहे. हे चित्रप्रदर्शन दि. 22 ते 27 ऑक्टोबर दरम्यान राहील. या चित्रप्रदर्शनास देश-विदेशातील चित्र रसिक भेट देणार आहे. अवघ्या वयाच्या तेवीसाव्या वर्षी जगप्रसिध्द अशा जहांगिर आर्ट गॅलरीत अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटींग या विषयातील चित्रांना स्थान मिळणे हे क्वचितपणे जळगावातील पहिलेच उदाहरण आहे. यामुळेच अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटींगमध्ये जळगाव ही कुठे कमी नाही हे देश-विदेशात समजेल, अशी माहिती डॉ. संजीव हुजूरबाजार यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शिवम हा सुप्रसिध्द समाजसेवी कै. डॉ. अविनाश आचार्य व अनुराधा आचार्य यांचा नातू असून सुप्रसिध्द न्युरोसर्जन डॉ. संजीव हुजूरबाजार व स्त्रीरोगतज्ञ डॉ. आरती हुजूरबाजार यांचा मुलगा आहे. त्याची सुरुवात ऑगस्ट 2013 रोजी व.वा.वाचनालय,जळगाव येथे कॉम्प्युटर ऑसिस्टेड ड्रॉईंग्स प्रदर्शनाने झाली. त्यानंतर पु.ना.गाडगीळ कलादालन जळगाव येथे ऑगस्ट 2018 रोजी अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग या विषयावर प्रदर्शन (सोलो) संपन्न झाले. या चित्रप्रदर्शनाचा जळगावातील चित्ररसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. हे शिवमचे दुसरे चित्रप्रदर्शन होते. त्यानंतर ‘माझ्या मनातला कॅनव्हास’ राजा रविवर्मा कलादालन घोळे रोड, शिवाजीनगर, पुणे येथे ऑगस्ट 2019 रोजी संपन्न झाले. पुण्यातील चित्र रसिकांनी या चित्रप्रदर्शनास भरभरून दाद दिली. हे शिवमचे तिसरे सोलो चित्र प्रदर्शन ठरले.

त्यानंतर प्रज्ञावर्धिनी स्कूल ऑफ आर्टच्या कॉलेजचे गृप प्रदर्शनातही शिवमच्य चित्रांना स्थान दिले होते. हे शिवमचे चौथे चित्रप्रदर्शन ठरले. आता दि. 22 ते 27 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारे जगप्रसिध्द जहांगिर ऑर्ट गॅलरीतील अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगचे चित्रप्रदर्शन हे शिवमचे पाचवे चित्रप्रदर्शन आहे. अगदी कमी वयात 23 व्या वर्षीच शिवमच्या चित्रकृतींना पाच प्र्रदर्शनाचा मान मिळाला. शिवमच्या चित्रांचे विषय हे निसर्गाशी संबंधित व आधारीत आहे. शिवमला वयाच्या 7 व्या वर्षापासून चित्रकलेची विशेष आवड आहे. सुरुवातीला कॉम्प्युटरवर निरनिराळी चित्रे काढण्याचा छंद व त्यातूनच हजारो चित्रांची निर्मिती शिवमने केली. याकामी त्याला त्याच्या आई-वडिल व बहिणीचे सहकार्य मिळाले.तसेच प्राचार्य जितेंद्र भारंबे, योगेश सुतार यांचे मार्गदर्शन लाभले,असेही त्यांनी सांगितले. यावेळी नितीन नेमाडे, डॉ. आरती हुजूरबाजार आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!