Type to search

जळगाव

आरोपींच्या अर्जावर आज कामकाज

Share

जळगाव । घरकुल घोटाळ्यात धुळे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या 28 आरोपींनी जामीनासाठी औरंगाबाद खंडपीठात केलेल्या अर्जावर बुधवारी कामकाज अपूर्ण राहिल्याने या प्रकरणात आज गुरूवार रोजी पुन्हा कामकाज घेण्यात येणार आहे.

घरकुल घोटाळ्यातील आरोपींना धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींनी जामीन तसेच जिल्हा न्यायालयाच्या निकालाला स्थगिती मिळावी यासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर बुधवारी खंडपीठात न्यायमुर्ती तानाजी नलावडे यांच्या द्विसदस्यीय पीठासमोर कामकाज घेण्यात आले. सकाळच्या सत्रात आरोपींच्या वकीलांनी युक्तीवाद केल्यानंतर दुपारच्या सत्रात सरकारी वकीलांनी युक्तीवादाला सुरूवात केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया तसेच न्याय निवाडांच्या विविध दाखल्यावरून न्यायालयाने शंका उपस्थित केल्यामुळे कामकाज अर्धवट थाबंवावे लागले. दरम्यान या प्रकरणात आज पुन्हा खंडपीठासमोर कामकाज होणार आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह 28 जणांनी जामीन तसेच निकालाला स्थगिती मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.

सरकारी वकिलांना खडसावले
आरोपीच्या जामीनावर युक्तीवाद सुरू असताना न्यायालयाने आरोपींना दिलेली दंडाची शिक्षा याबाबत सरकार पक्षाकडून ठोस बाजू मांडली जात नसल्याने व याप्रकरणाशी संबधित विविध न्यायनिवाड्यांबाबत विशेष सरकारी वकील अमोल सांवत यांना नेमक्यापणाने बाजु मांडता न आल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत अभ्यास करून येत चला अशा भाषेत सरकारी वकिलांना खडसावले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!