Type to search

धुळे

आरोग्य विभाग सुस्त, अधिकारीही फिरकेना

Share

बोराडी | येथील एकाचा स्वाईन फ्ल्यू आजारामुळे उपचारादरम्यान मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. असे असतांनाही आरोग्य विभाग सुस्त असून अधिकारी देखील गावात फिरकले नाही. युद्ध पातळीवर कोठेही उपाययोजना करण्यात आल्या नाही. केवळ गावात प्रत्येक घरी जावून पाण्यात औषधे टाकण्यात येत आहे. गावात धुरळणी न झाल्याने गावकर्‍यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्वाईन फ्ल्यू आजारामुळे जितेंद्र पाटील यांचा काल मृत्यू झाला. त्याचा आज सकाळी मुंबईहुन बोराडीला मृतदेह आणण्यात आला. त्याच्या सोबत मुंबई रुग्णालयातील दोन डॉक्टर, कर्मचारी आले होते. त्यांनी मृतदेहास कोणालाही हात लावू दिला नाही. व सर्व विधी त्यांच्या पध्दतीने केला आहे. शोकाकुल वार्तावरणात त्यांच्या मुलाने मुखअग्नी दिला. आज दुपारपर्यंत सर्व व्यावसायिक व्यापारी वर्गाने बंद पाळला होता.

स्वाईल फ्ल्यु या आजाराची लागण त्यांच्या जितेंद्र पाटील यांच्या घरा जवळपास झाल्याचे बोलले जात आहे. कारण त्या परिसरात वराह (डुक्कर) यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून ठिकठिकाणी पाणी साचलेले होते. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे स्वाईन फ्ल्यू आजारामुळे मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

याबाबत प्रशासनाने लक्ष देवून या आजाराचा प्रसार थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. गावा बाहेर काही मृत झालेले वराह, गुरांना उघडयावर फेकून दिले जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्यामुळे त्या रस्त्याने ये-जा करणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या दुर्गधीमुळे देखील गावात आजार पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून उघड्यावर मृत जनावरे फेकणार्‍यावर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच गावातील गल्ल्यामध्ये व घरामध्ये धुरळणी करण्याची गरज आहे. तरी संबंधीत विभागाने त्वरित दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!