आरोग्यदूत : अ‍ॅझुस्पर्मिया ऑलीगोस्पर्मिया

0
पुरुषाची सर्वात उपयुक्त व महत्त्वाची तपासणी म्हणजे वीर्य तपासणी. यासाठी पुरुषाने हस्तमैथुनाचे वीर्य काढून, ते स्वच्छ बाटलीतून लवकरात लवकर अर्धा ते एक तासात लॅबोरेटरीमध्ये देणे आवश्यक असते.
निरोध (कंडोम) मध्ये गोळा केलेले वीर्य कधीही तपासण्यासाठी देऊ नये, कारण निरोधच्या रबराच्यामुळे व आतील कोटिंग पावडरमुळे शुक्रजंतू मरतात व चुकीचा रिपोर्ट येऊ शकतो.
वीर्य तपासणीस देण्यापूर्वी पुरुषाने 3 ते 4 दिवस स्त्रीशी संबंध ठेवलेला नसावा किंवा हातानेही वीर्य काढून टाकलेले नसावे. कारण त्यामुळे शुक्रजंतूंचे प्रमाण खूपच कमी येऊ शकते.

या वीर्याच्या तपासणीमध्ये वीर्य किती सी.सी. आहे. (नेहमी 2 ते 5 सी.सी. असते) शुक्रजंतूंचे प्रमाण किती आहे. (नेहमी 80 million ml पेक्षा जास्त असते.)

शुक्रजंतूंची हालचाल कशी आहे व 2 तास, 4 तास वगैरे वेळानंतरही किती आहे ते पहातात. शुक्रजंतूंमध्ये अ‍ॅबनॉर्मल शुक्रजंतूंचे प्रमाणही पहातात (20 ते 25% पेक्षा जास्त अ‍ॅबनॉर्मल शुक्रजंतू असू नयेत.)

काही वेळा शुक्रजंतूंचे प्रमाण खूप असले तरी सर्व मेलेले असतात. (नॅक्रोस्पर्निया) त्यांना गर्भधारणा होणे फारच अवघड असते. काही शुक्रजंतूंसमवेत खूपच इन्फेक्शन असल्याचे दिसते.

डॉ नेहा लाड
डॉ नितीन लाड

वर सांगितल्याप्रमाणे शुक्रजंतूंचे प्रमाण आणि त्यांची हालचाल  हे फार महत्त्वाचे आहे.अजिबात एकसुद्धा शुक्रजंतू नसेल तर त्याला अ‍ॅझुस्पर्निया म्हणतात.

20 million ml पेक्षा कमी शुक्रजंतू नसेल तर त्याला ऑलीगोस्पर्मिया म्हणतात. जर अ‍ॅझूस्पर्निया किंवा ऑलीगोस्पर्मिया असा रिपोर्ट आला तर लगेच नर्व्हस होण्यापेक्षा पुन: 3-4 महिन्यांची धातूची तपासणी करून खात्री करून घ्यावी. शुक्रजंतूंचे प्रमाण काही वेळा खूप कमी असूनही चांगली गर्भधारणा राहू शकते हे लक्षात असू द्यावे.

वीर्यामध्ये शुक्रजंतूंसोबत खूपच इन्फेक्शन असेल तर 8 ते 10 दिवस अ‍ॅण्टीबायोटिक्सचा कोर्स घ्यावा व 2 आठवड्यांनी पुन: धातू तपासून इन्फेक्शन नाहीसे झाल्याचे पहावे. क्वचित अशा पुरुषांना डायबिटीसही निघू शकतो. त्यांची रक्तातील/ धातूतील साखर वाढल्याने इन्फेक्शन होऊ शकते.

धातूमधील फ्रक्टोज साखरेचे (नाँर्मल) प्रमाण, शुक्रजंतूच्या (नॉर्मल) हालचालीसाठी आवश्यक असते.

 

LEAVE A REPLY

*