Type to search

जळगाव

आरपीएफकडून प्रवाशांची तिकीट तपासणीच्या नावावर लूट

Share

जळगाव । जिल्हापरीसरात असलेल्या मध्य वा पश्चिम रेल्वेमार्गावर रेल्वे प्रवासा दरम्यान आरपीएफ जवानांकडून तिकीट तपासणी केली जात आहे. तसेच प्रवाशांकडून दमदाटी करून दंड भरण्याच्या नावावर पैसे न दिल्यास आतमधे टाकण्याची धमकी देउल वसूली करताना हे कर्मचारी दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. यामाध्यमातून आरपीएफच कार्य तिकीट तपासणी करीत असल्यास तिकीट तपासनीसाचे काय काम व सुरक्षेचे काम कोणाचे असा देखिल प्रश्न समोर येत आहे.

बर्‍याचदा हे आरपीएफ जवान रेल्वे इंजिनाच्या मागील लगेजच्या डब्यात तसेच विनाआरक्षीत बोगीत तिकीट तपासणीच्या नावाखाली रेल्वे तिकीट असले तरी दंडात्मक कारवाई म्हणून विनाकारण वर्दीचा धाक दाखवत पैशांची मागणी करीत असतात. प्रवासी देखिल वाद नको म्हणून मुकाटयाने गयावया करीत पैसे भरण्यास तयार होतात . या प्रकाराची कोठेही हाकबोंब होत नसल्याने या रेल्वे पोलिस कर्मचार्‍यांचे बरेच फावत असते.

बेल,कडूलिंब,काडया केळीपाने गठ्ठेवाल्यांकडून सुरुवात
प्रवासी रेल्वेगाडयातून रावेर तसेच बोदवड मार्गाने येणार्‍या गाडयांमधून दररोज बेल,कडूलिंब पाला,काडया,केळीपानांचे गठ्ठे घेउन जाणार्‍या महिलांकडून एकाद्या पंटरच्या माध्यमातून सामूहिकरित्या कलेक्शन करून आल्यानंतर आरपीएफकडून बिनतक्रार दहा रूपयांपासून तर 50 रूपयांपर्यत वसूली होते ती दोन बोग्यांच्या मधल्या भागात. तर चल तिकीट तपासनीसांकडून देखिल अगले स्टेशनपर उतार दूंगा म्हणून चिरीमिरी घेतली जात असल्याचे चित्र आहे. तर कधीकधी याचा गैरफायदा देखिल घेतला गेल्याची घटना घडली असून एक पोलिस कर्मचारी सेवेतून बरखास्त देखिल झालेल्याचे बोलले जात आहे.

वेंडरकडून सर्व सुविधा फूकट
रेल्वे प्रवासात कर्तव्यावर असणार्‍या बहुतांश आरपीएफ कडून रेल्वेच्या सर्वसाधारण वा आरक्षीत बोगीत परवाना धारक तर काही विनापरवानाधारक खाद्यपदार्थ, थंडपेय, पाणी विक्रेत्यांकडून फूकटात वस्ते पदरात पाडून घेतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!