‘आरती – द अननोन लव्हस्टोरी’ मधील गाण्यांचा सोशल मिडीयावर धुमाकूळ

0

सर्वांनाच आता श्री गणेशाच्या आगमनाचे वेध लागले असून चित्रपटाच्या आणि अल्बमच्या माध्यमातून अनेक नवीन गाणी या उत्सवाच्या दरम्यान येत असतात.

गणेशोत्सवाच्या अगोदर गणपतीची आराधने करणारे एक भावस्पर्शी गीत आरती – द अननोन लव्हस्टोरी या आगामी चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती-दिग्दर्शन सारिका मेणे यांनी केले आहे.

पार्वतीच्या नंदना मोरया गजानना असे बोल असलेल्या या गीताला गायक आदर्श शिंदे यांनी गायलंय. सुजित यादव आणि तेजस बने यांनी हे गीत लिहिले आहे.

गणपतीची आराधना करणारे हे गीत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेत गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण अधिकच मंगलमय करेल असा विश्वास गायक आदर्श शिंदे यांनी व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

*