‘आरटीई 25 टक्के’साठी 17 हजार अर्ज ; सुमारे साडे सहा हजार पाल्य नोंदणी अपूर्ण

0

नाशिक : वंचित घटकांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक पूर्व आणि प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार सुरु असलेल्या ऑनलाइन नोंदणीत सुमारे 17 हजार 74 े पालकांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सुमारे साडे सहा हजार अर्ज अपूर्ण असल्याने लॉटरी प्रक्रिेयेत हे अर्ज विचारात घेतले जाण्याची शक्यता नाही.

शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत 2 मार्चपर्यंत वाढून दिलेली होती. मात्र, पालकांना येणार्‍या तांत्रिक अडचणी आणि अर्ज भरण्यास होत असलेला विलंब यामुळे या वाढीव मुदतीत ऑनलाईन अर्ज नोंदणीचा आकडा अधिक वाढलेला दिसत नाही. त्यामूळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे अर्ज 24 फेबु्रवारीपर्यत जेवढी विद्यार्थी नोंद संकलित झाली होती. त्या तुलनेत कमी भर आकडेवाडीत पडलेली आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील 458 खासगी शाळांची नोंद 25 टक्के प्रवेशासाठी झालेली आहे. या शाळांमधून सुमारे 6380जागा आरक्षित असून त्यावर प्रवेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण विभाग प्रक्रिया राबवत आहे. आतापर्यंत जेवढे अर्ज पालकांनी ऑनलाइन नोंदवले आहे. त्यापैकी सुमारे 5 हजार 797 अर्ज पूर्णपणे भरण्यात आलेले आहे. त्यामूळे निम्यापेक्षा अधिक अर्ज हे परिपूर्ण होण्याच्या प्रक्रियेत अडकले आहे. पालकांना ते पूर्ण करण्यास शालेश शिक्षण विभागाचे संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने सुरु राहत नसल्याने अडचणी येत असल्याची तक्रार आहे.
काही पालकांनी एकापेक्षा अधिक जागांसाठी अर्ज केल्याने ती संख्या अधिक होते. पूर्व प्राथमिक विभागात लहान-मोठा गट आणि प्राथमिक गटात इयत्ता पहिलीच्या इंग्रजी माध्यमासाठी पालकांचा कल अधिक असल्याचे चित्र आहे. शाळांची अंतर मर्यादा एक ते 3 किमी आणि त्यापेक्षा अधिक आहे. शासनाने नर्सरी वयोमर्यादा तीन ते साडेचार वर्ष अशी केली आहे.

LEAVE A REPLY

*