आय लव्ह विथ हिम!

0

मुलीच्या नावे फेसबुक अकाउंट होणार्‍या नवर्‍याला पाठविले मेसेज

अहमदनगर (प्रतिनिधी)- अ‍ॅरेजं मॅरेज मोडण्याच्या उद्देशाने होणार्‍या नवर्‍याला ‘आय लाईक —- पर्सन, आय लव्ह विथ हीम..’अशा आशयाचे मेसेज पाठविण्यात आले. त्यासाठी मुलीच्या नावे फेक फेसबुक अकौंटही उघडण्यात आले आहे. या प्रकारामुळे दोघांत मनोमिनलापूर्वीच कटुता निर्माण झाली आहे. कटुता दूर करताना मुलीच्या कुटुंबियांच्या नाकीनऊ आले आहेत. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
16 जुलै ते 20 जुलै दरम्यान हा प्रकार घडला. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील उच्चशिक्षित मुलीचा विवाह नुकताच निश्‍चित झाला आहे. तिर्‍हाईत व्यक्तीने ‘यशवंती’ नावाने फेक फेसबुक अकौंट ओपन करून त्यावरून होणार्‍या नवर्‍याला मेसेज पाठविले. त्यात ‘मला हे लग्न करायचे नाही, आय लव्ह विथ …पर्सन, आय लव्ह हिम’… असा मजकूर असलेला मेसेज पाहिल्यानंतर भावी पतीने मुलीस फोन करून तिच्याकडे विचारणा केली. त्यानंतर फेक फेसबुक अकौंट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मुलीने पाथर्डी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पाथर्डी पोलिसांनी भारतीय तंत्रज्ञान 2000 कलम 66 सी नुसार गुन्हा दाखल करून तपासासाठी तो सायबर सेलकडे वर्ग केला आहे.

LEAVE A REPLY

*