आयोलाल… झुलेलाल..!

0

जळगाव | प्रतिनिधी :  शहरातील सिंधी बांधवांतर्फे चेट्रीचंड सिंधीयत (गुढीपाडवा) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातून शोभायात्रा काढून भगवान झुलेलाल देवतेला विश्‍वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.

कंवरनगर येथील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टतर्फे, झुलेलाल उत्सव समिती व पूज्य पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने चेट्रीचंड सिंधीयत दिवस साजरा करण्यात आला. फुले मार्केट येथील मरिमाता मंदिर येथून दुपारी ३ वाजता पूजा अर्चना करण्यात आली.

यावेळी अशोक मंधाण, राजू अडवानी, झुलेलाल उत्सव समिती अध्यक्ष विजय दारा, कन्हैय्यालाल कुकरेजा, सतिष मत्ताणी, कन्हैय्यालाल हासिजा व सेंट्रल पंचातचे पदाधिकारी व सदस्यगण अमर शहीद संत कंवराम ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्यगण उपस्थित होते. शोभायात्रेच्या अग्रभागी भगवान झुलेलाल देवतेची प्रतिमा सजविलेला रथ होता. तसेच सदरामदास साहेब, संत कंवरराम साहेब, संत बाबा हरदासराम साहेब, संत बाबा गेलाराम साहेब यांच्या प्रतिमाचेही रथ होते.

शोभायात्रेत सहभागी महिला मंडळाच्या महिला सदस्य व सिंधी बांधवांनी पारंपरिक टिपरी नृत्य खेळून आनंद उत्सव साजरा केला. गोदडीवाला मार्केट मार्गे शिवाजी रोड, पंकज ऑटो शोरूम, न्यू. बी. जे. मार्केट, गुरुद्वारा जवळील झुलेलाल हॉल येथे शोभायात्रा आल्यावर सिंधी पंचायतीतर्फे तीर्थ प्रसादान करण्यात आले.

यादरम्यान माजी महापौर विष्णु भंगाळे यांच्या परिवाराने शोभायात्रेचे स्वागत केले. जिल्हा रुग्णालयामार्गे संत कंवरराम चौकात शोभायात्रा पोहचल्यावर संत कंवरराम यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी केले. त्यानंतर शोभायात्रा पंचमुखी हनुमान मंदिर मार्गे, गणेशनगर, संत बाबा हरदास मंगल कार्यालय मार्गे कंवरनगर पोलिस चौकीमार्गे पूज्य सेवा मंडळ येथे रात्री पोहचल्यावर भगवान झुलेलाल देवतेची पूजा अर्चना करून शोभायात्रेचे सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

*