Type to search

आयुर्वेदिक औषधानाही साईड इफ्फेक्ट

आरोग्यदूत

आयुर्वेदिक औषधानाही साईड इफ्फेक्ट

Share

अयुष औषधे अ‍ॅलोपॅथी औषधांना साधारणत: आधुनिक औषध मानले जाते. याखेरीज आपण आयुर्वेदिक, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी असे इतर औषध प्रकारही वापरत असतो. पारंपरिक किंवा पर्यायी (Alternative or Traditional Medicines) औषधे असे यांना म्हटले जाते. अयुष (Ayurvedic, Unani, Siddha Homeopathy) असा वेगळा विभागच केंद्र सरकारने या औषधांसाठी स्थापन केला आहेे. आधुनिक औषधांसाठी असलेले कडक निकष, प्रदीर्घ चाचणी प्रक्रिया यासाठी लागू होत नाहीत.

आयुर्वेदिक, हर्बल औषधे : साईड इफेक्ट फ्री?ही औषधे ‘साईड इफेक्ट फ्री’ अशी सर्रास जाहिरात असते व तशी आपल्या सगळ्यांचीच समजूत असते; पण या औषधांनाही साईड इफेक्ट असू शकतात. आज बाजारात अशा औषधांची नुसती भाऊगर्दी आहे. पूर्वी आपल्या पूर्वजांनी ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेली आयुर्वेदिक औषधे व आजची बाजारातील औषधे यात बरीच तफावत असू शकते. सर्व उत्पादक या ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेली आयुर्वेदिक औषधे व आजची बाजारातील औषधे यात बरीच तफावात असू शकते. सर्व उत्पादक या ग्रंथोक्त पद्धती कसोशीने पाळतात का? औषधांचे प्रमाणीकरण, क्वॉलिटी कंट्रोल याबाबतही साशंकतेला जागा असते. या बाबतचे कायदेही अजून परिपूर्ण नाहीत.

अनेक औषधांमध्ये जड धातूंचे घातक प्रमाण आढळले, कधी अ‍ॅलोपॅथिक औषधे मिसळलेली आढळली, या बातम्या आपण वाचतो. दीर्घकाळ औषधे घेतली व त्यामुळे मूत्रपिंड, यकृत यावर परिणाम झाला, असेही वाचनात येते. एकंदर सुरक्षितता व गुणकारकता या दोन्ही कसोट्यांवर सध्याची उपलब्ध सर्वच आयुर्वेदिक/ हर्बल औषधे उतरतील का?

म्हणूनच ही औषधे घेतानाही सावधगिरी हवी. स्वमनाने अतिवापर, दीर्घकाळ वापर टाळायलाच हवा. या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यांनेच ही औषधे घ्यावीत. अ‍ॅलोपॅथीची औषधे सुरू असतील तर त्याचीही कल्पना आयुर्वेदिक डॉक्टरांना द्यावी. काही आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथीच्या औषधांची शरीरात मारामारी (इंटरअ‍ॅक्शन) होऊन दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वेगवेगळी ‘पॅथी’ वानरतांना काळजी व योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यकच.

* आयुर्वेदिक, हर्बल औषधांनाही काही दुष्परिणाम असू शकतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. * प्रसार माध्यमातील व इतरत्र दिसणार्‍या जाहिरातींना भुलून औषधांचा प्रयोग स्वत:वर करू नये.

औषधांना दुष्परिणाम असतात का?प्रत्येक औषधाला त्याच्या अपेक्षित परिणामाखेरीज इतर सहपरिणामही असतात. हे सहपरिणाम जर त्रासदायक असतील तर त्यांना दुष्परिणाम म्हटले जाते. वेळोवेळी वेगवेगळ्या औषधांच्या संदर्भात या दुष्परिणामांची चर्चा केली आहे. जेथे परिणाम आहे, तेथे दुष्परिणाम आहेत, असेच औषधांबाबत दिसते; पण म्हणून घाबरून न जाता हे नेमके काय असू शकतात, हे डॉक्टर व फार्मसिस्टकडून जाणून घेणे व जागरुक राहणे महत्त्वाचे. प्रत्येक रुग्णामध्ये हे दुष्परिणाम दिसतीलच असेही नसते. अनेक रुग्ण औषधांना सरावतात व सुरूवातीस वाटलेले दुष्परिणाम नंतर दिसेनासे होतात. योग्य औषध, योग्य प्रमाणात, योग्य रुग्णास योग्य कालावधीसाठी दिले (रॅशनल ड्रग युज), की दुष्परिणामांची शक्यता कमी होऊ शकते.

दुष्परिणामांची काही उदाहरणे :
* सर्दीच्या काही औषधांनी झापड येते. * काही अँटिबायोटिक्सनी पोट बिघडते. * मधुमेंहावरील काही औषधांनी रक्तशर्करा नॉर्मलपेक्षा कमी होते. * डाययुरेटिक (Diuretuc) या लघवीचे प्रमाण वाढवणार्‍या औषधांनी घशाला कोरड पडते.

डायएरी सप्लिमेंट/ फूड सप्लिमेंट/ न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे काय?
आहाराला पूरक म्हणून ही प्रॉडक्ट्स वापरली जातात. यात जीवनसत्त्वे, क्षार, प्रोटीन्स, एन्झाईम्स किंवा तत्सम अन्नघटक असतात. टॅब्लेट, कॅप्सूल, पावडर किंवा द्रव स्वरुपात ही प्रॉडक्ट्स आहेत. लेबलवर Dietary Supplement Am{U Not for Medicinal Use लिहिलेले असू शकते.

औषध या प्रकारात ही प्रॉडक्ट्स मोडत नाहीत व त्यामुळे औषधविषयक कायद्यांचेही यावर नियंत्रण नसते. अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याखाली (झीर्शींशपींळेप ेष ऋेेव अर्वीश्रींशीरींळेप, झऋअ) याचे लायसेन्सिंग असते. उत्पादक स्वत:च्या पद्धतीने प्रॉडक्टचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न करतात. या प्रकारच्या प्रॉडक्टबद्दल कोणतीही तक्रार आपण (ऋऊअ) कडे करू शकता.

बाजीराव सोनवणे 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

Next Up

error: Content is protected !!