आयसीसी क्रमवारीत स्मृती मंधानाची प्रगती

0
दुबई । आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या महिलांच्या टी-टवेन्टी क्रमवारीत मराठमोळी स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्जने प्रगती केली आहे. स्मृती मंधानाने 4 स्थानांची प्रगती करताना सहावे स्थान तर, जेमिमानेही 4 स्थानांची प्रगती करताना दुसर्‍या स्थानावर धडक मारली आहे. पहिल्या स्थानावर न्यूझीलंडची सुझी बेटस कायम आहे.

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या 3 टी-टवेन्टी सामन्यांच्या मालिकेत स्मृती मंधानाने चांगली फलंदाजी करताना 3 सामन्यांत 180 धावा केल्या होत्या. यात तिने 2 अर्धशतके झळकावताना तिसरया सामन्यात 86 धावांची आक्रमक खेळी केली होती. तर, जेमिमानेही चांगली फलंदाजी करताना 132 धावा केल्या होत्या. तर, टी-टवेन्टी कर्णधार हरमनप्रीत 4 स्थानांनी घसरुण सातव्या क्रमांकावर आली आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची मेगन शट पहिल्यास्थानी तर, भारताची पुनम यादव दुसर्‍या स्थानी कायम आहे. फिरकीपटू राधा यादवने 18 स्थानांची प्रगती करताना 10 क्रमांकावर झेप घेतली आहे.

LEAVE A REPLY

*