Type to search

क्रीडा

आयसीसीच्या नियमात महत्त्वाचे बदल

Share

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने क्रिकेटमधील नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत. लंडनमध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत नियमातील बदलाचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही वर्षातील क्रिकेटमधील घटनांचा अभ्यास करून आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.

१ ऑगस्ट २०१९ पासून नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमाची सुरुवात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेपासून होणार आहे. बदली खेळाडूला ङ्गलंदाजी आणि गोलंदाजी करता येईल. तसेच षटकांची गती कमी राखल्यामुळे आता संपूर्ण संघातील खेळाडूंना दंड आकारण्यात येणार आहे.

अनेक वेळा खेळाडू जखमी झाल्यानंतर संघांना कमी खेळाडूंसह सामना खेळावा लागला आहे. सामन्यादरम्यान एखादा खेळाडू जखमी झाल्यानंतर संघाच्या कामगिरीवर देखील परिणाम होतो. म्हणूनच यापुढे बदली खेळाडू ङ्गलंदाजी आणि गोलंदाजी करू शकणार आहे. यापूर्वी बदली खेळाडू ङ्गक्त क्षेत्ररक्षण करत असे.

षटकांची गती धिमी राखल्याबद्दल यापुढे आंतरराष्ट्रीय कर्णधारांना बंदीला सामोरे जावे लागणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या नियमांत बदल केला असून, आता अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास, कर्णधाराऐवजी संपूर्ण संघाला ही शिक्षा भोगावी लागणार आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीने सुचवलेली ही शिङ्गारस आयसीसीने मान्य केली आहे. १ ऑगस्टपासून सुरू होणा-या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपासून हा नवा नियम लागू होईल. कर्णधारासह सर्वानाच समान शिक्षा सुनावण्यात येईल, असे आयसीसीच्या पत्रकात म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!