आयपीएलसाठी हार्दीक पांड्या तंदुरुस्त

0
मुंबई । भारतीय संघाला ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाकडून हार पत्करावी लागली. या दोन्ही मालिकेत परफेक्ट अष्टपैलू खेळाडूची उणीव प्रकर्षाने जाणवली. हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे ट्वेंटी-20 व वन डे मालिकेतून माघार घेतली होती. पण इंडियन प्रीमिअर लीगपूर्वी ( आयपीएल) पांड्या तंदुरुस्त झाला असून मुंबई इंडियन्सचे चाहते खूश झाले आहेत. बुधवारी पांड्यानं मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिरात सहभाग घेतला आणि कसून सरावही केला.

ऑस्ट्रेलियाविरुच्या दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात हार्दिक पांड्याला स्थान देण्यात आले होते. मात्र, पाठीच्या दुखण्यानं डोकं वर काढल्यानं त्याला या मालिकेतूनच माघार घ्यावी लागली. बीसीसीआयनं सुरुवातीला जाहीर केलेल्या संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी प्रकट केली होती, परंतु पांड्याच्या माघारीमुळे जडेजाला संधी मिळाली आहे. पण, जडेजाचा केवळ वन डे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला होता. पण त्याला एकाच सामन्यात खेळवण्यात आले.

हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना मकॉफी विथ करण- 6फ या कार्यक्रमात केलेलं विधान चांगलेच भोवले होते. बीसीसीआयने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यातून त्यांना माघारी बोलावले आहे. पण त्यांच्यावरील बंदी हटवण्यात आली आणि पांड्यानं न्यूझीलंडदौर्‍यातून संघात कमबॅक केले. पण मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात त्याने दुखापतीमुळे खेळणे टाळले.

LEAVE A REPLY

*