आयकर विभागाकडून 600 कोटीची संपत्ती जप्त

0

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 23 मे 2017 पर्यंत कोलकाता, मुंबई, दिल्ली या महानगरांसह गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये छापेमारी करण्यात आली.

यात 400 आर्थिक अनियमिततांचा छडा लावण्यात आला. यावेळी 240 प्रकरणात अघोषित संपत्ती जप्त करण्यात आली असून, याची किंमत जवळपास 600 कोटी रुपये आहे.

तर 40 प्रकरणातील 530 कोटीची संपत्ती अचल स्वरुपातील आहे.

आयकर विभागाच्या कारवाईत मध्यप्रदेशच्या जबलपूरमधील एका ड्रायव्हरच्या नावावर तब्बल 7.7 कोटीची जमीन असल्याचं उघड झालं.

या जमीनीचा मालक मध्यप्रदेशमधील शेअर दलाल होता. तर मुंबईतल्या एका कारवाईत एका व्यक्तीने बोगस कंपनीच्या नावाखाली अघोषित संपत्ती गोळा केली होती.

LEAVE A REPLY

*