आयएमए, मार्डचा संप मागे ; नाशिकमधील दवाखाने नियमित सुरु

0

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मार्डचा संप मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर मुंबईसह नाशिकमध्येही मागे घेण्यात आला आहे. याबाबत आयएमएचे अध्यक्ष अनिरुद्ध भांडारकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संप मागे घेण्यात आल्याची माहिती दिली आहे. लवकरच नाशिकमधील खासगी दवाखाने सुरु होणार आहेत.

मुंबईत संप मागे घेतल्यानंतर नाशिकमध्ये वरिष्ठांकडून आदेश मिळालेले नसल्यामुळे डॉक्टर संभ्रमात होते. तर अनेक डॉक्टर आदेशाची वाट बघत होते त्यांनाही आता दवाखाने उघडण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ताठकळून बसलेले रुग्ण आता उपचार घेऊ शकणार आहेत.

मार्डकडून संप मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करण्यात आले आहे. तसेच उद्या सकाळी 8 वाजल्यापासून कामावर रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा कामावर रुजू व्हा , नाहीतर कारवाई करू असा इशारा  दिल्यानंतर अखेर इंडियन मेडिकल असोशिएशनच्या डॉक्टरांनी मुंबईत संप मागे घेतल्याची माहिती आहे.

मार्डपाठोपाठ आयएमएने संप मागे घेतल्यामुळे अनेक डॉक्टरांनी दवाखाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांना तपासणीची काही महिन्यांनी वेळ दिलेली आहे. त्यामुळे अनेक डॉक्टरांकडून रुग्णांच्या तपासनीस सुरुवातदेखील केली जाणार असल्याची माहिती दिली जात आहे.

LEAVE A REPLY

*