‘आयएमए’ अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत

0

नाशिक | एबीबीएस, एमडी डॉक्टरांची संघटना ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए)च्या अध्यक्षपदासाठी बुधवार (दि. १५) रोजी निवडणूक घेण्यात येत आहे. निवडणुकीत १ हजार ६०० डॉक्टर मतदानाचा हक्क बजावतील. अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच ३ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी १ वर्ष अगोदरची निवडणूक घेतली जाते. मागील वर्षी २०१७ या वर्षासाठी डॉ. मंगेश थेटे विजयी झाले होते. यंदाची ही निवडणूक २०१८ साठी घेतली जात आहे. यासाठी डॉ. शोधन गोंदकर, डॉ. आवेश पलोड, डॉ. चंद्रकांत सुरवसे निवडणूक रिंगणात असल्याने चुरस निर्माण होणार आहे.

येत्या बुधवारी निवडणूक होणार असून त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. सतीश पाटील, डॉ. मनोज चोपडा, डॉ. पंकज गुप्ता काम पाहणार आहेत. शालिमार चौक येथील इंडियन मेडिकल असोसिएशन संस्थेच्या सभागृहात दुपारी २ ते सायंकाळी ६ दरम्यान निवडणूक पार पडेल.

तसेच आयएमए महाराष्ट्र टीबी सॅनेटोरियम (म्हसरुळ) येथील निवडणूक बिनविरोध झाली आहे. यात इंडियन मेडिकल असोसिएशन वुमेन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील, डॉ. विजय गवळी, डॉ. समीर पावर यांचा समावेश आहे.

सदस्य बिनविरोध
११ सदस्यांच्या प्रशासकीय सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी उपाध्यक्ष म्हणून डॉ. चंद्रशेखर गुजराथी, सचिव म्हणून डॉ. हेमंत सोननीस, कोषाध्यक्ष डॉ. किशोर शिंदे, डॉ. मिलिंद भरडिया, डॉ. अतुल पाटील, डॉ. सुशांत भदाणे, डॉ. नलिनी बागुल, डॉ. वर्षा लहाडे, डॉ. राजेश धाडीवाल, डॉ. मुकेश अग्रवाल, डॉ. अजित तिदमे यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*