Type to search

आम्ही कॉंग्रेसचेच, संघर्षातून विजय मिळविणे हा स्वभाव!

Share

धुळे | तालुक्यातील जनतेशी आमची बांधिली आहे. येथील जनता आणि कार्यकर्ते हीच खरी आमची शक्ती असून धुळे तालुक्यात फक्त दाजी फॅक्टर आहे. माझ्यासह रोहिदास पाटील हे कॉंगे्रसचे आहेत. त्यामुळे कठीण परिस्थितीवर मात करुन संघर्षातून विजय मिळविणे हाच आमचा व कार्यकर्त्यांचा स्वभाव आहे. जनता पळून जाणार्‍यांची पात्रता त्यांना एक दिवस निश्‍चित दाखवेल. म्हणून आम्ही धुळे तालुक्यातील जनतेचं देणं लागतो, त्यामुळे लोकसेवेचे व्रत कधीच सोडणार नसल्याचे आ.कुणाल पाटील यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.

बोरविहीर (ता.धुळे) येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोरविहीरसह तालुक्यातील एकूण ९४२ रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कृषी मंत्री रोहिदास पाटील हे होते. कार्यक्रमात बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की,धुळे तालुक्यातील जनतेला अद्ययावत आणि तातडीची आरोग्यसेवा देता यावी म्हणून आम्ही सर्वच प्रयत्न करीत असतो.अनेकवेळा मुंबईतील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची स्वतः भेट घेवून त्यांना उपचाराची सुविधा मिळवून देत असतो. समाजाचे आम्ही देणं लागतो म्हणून लोकसेवेचे व्रत आम्ही कधीच सोडणार नाही. आज तालुक्यात फिरत असतांना जनतेमध्ये प्रचंड आत्मविश्‍वास पहायला मिळतो. इतरत्र कोणताही फॅक्टर असला तरी धुळे तालुक्यात दाजी फॅक्टरच आहे, कठीण परिस्थितीवर मात करीत संघर्षातून मात करीत विजय मिळविण्याचा आमचा आणि कार्यकर्त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे पळून जाणार्‍यांना त्यांची पात्रता जनता दाखविल्याशिवाय राहणार नाही आणि दाजी फॅक्टरपुढे सर्वच फॅक्टर फेल होतील, असा विश्‍वास आ.कुणाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमात कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर आ.कुणाल पाटील यांनी शिबीरातील विविध तपासणी कक्षात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. योग्य उपचाराचाही सल्ला त्यांनी डॉक्टरांना दिला. रुग्णांना यावेळी मोफत औषधे देण्यात आली. कार्यक्रमाला माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यासोबत आ.कुणाल पाटील, कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, माजी पं.स.सभापती भगवान गर्दे, डॉ.दरबारसिंग गिरासे, माजी जि.प.सभापती शांताराम राजपूत, प्रदिप देसले, महादू गवळी, सरपंच विजय पाटील, डॉ.दिलीप पाटील, मधुकर पाटील, पं.स.सदस्य छोटू चौधरी, अरुण पाटील, वसंतराव सोनवणे, संजय अहिरे, अजबराव पाटील, लक्ष्मण अहिरे, भाऊसाहेब पाटील जुनवणे, प्रकाश पाटील, जंगलू गवळी, झिपा सोनवणे, मधुकर माळी, आरोग्यसेवक गोकुळ राजपूत यांच्यासह परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्य शिबिराला जवाहर मेडीकल फॉंडेशनचे आण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालय तसेच दंत महाविद्यालय व हॉस्पीटल यांचे सहकार्य लाभले.

पोस्टर्स प्रदर्शनातून जागृती
मोफत आरोग्य शिबीराबरोबरच तेथे येणार्‍या रुग्णांना विविध आजारांविषयी माहिती मिळावी, साथीच्या काळात काय काळजी घ्यावी? यावर जनजागृती करणारे पोस्टर्स प्रदर्शनही शिबीराच्यास्थळी लावण्यात आले होते. या माध्यमातून रुग्णांना मार्गदर्शन मिळत होते.

Leave a Comment

error: Content is protected !!