आनंदाने जगण्यासाठी कला महत्त्वाची – नीशा जैन : व्यवसायिक नाट्यनिर्मिती प्रयोगाचा शुभारंभ

0

जळगाव | प्रतिनिधी :  जळगाव नगरी बदलतेयं. नव्हे तर सांस्कृतिक चळवळ होत आहे. नवीन विचार प्रगतीचे लक्षण असते. त्यामुळे एखादी कला छंद म्हणनू जोपासावी, कला ही आनंदाने जगण्यासाठी महत्त्वाची असते, असे मत अनुभूती स्कूलच्या संचालिका नीशा जैन यांनी व्यक्त केले.

चांदोरकर प्रतिष्ठान, महालक्ष्मी प्रोडक्शन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ.हेमंत कुळकर्णीलिखित ‘संगीत संशेवकल्लोळ’ व्यवसायिक  नाट्यनिर्मिती प्रयोगाच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजेंद्र पाटणकर, दीपक चांदोरकर, प्रा.शरदचंद्र छापेकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे सहाय्यक महाव्यवस्थापक अविनाश कणिकर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व नारळ वाढवून व्यवसायिक नाट्यनिर्मिती प्रयोगाचा शुभारंभ करण्यात आला. राजेंद्र पाटणकर म्हणाले की, नाटकाला भाषेचा अडसर नसतो. खान्देश ही बुद्धीवंतांची भूमी आहे़  याच मातीतील कलाकार व्हावा आणि लेखन दिग्दर्शनही येथील असावे, असे वाटले आणि नाट्यलेखन व नाट्यनिर्मिती दिग्दर्शनाची जबाबदारी डॉ.हेमंत कुळकर्णी यांनी दिली, असे म्हणत अभिनय हे संवादाचे माध्यम असल्याचे पाटणकर यांनी स्पष्ट केले.

दीपक चांदोरकर यांनी जळगावचे नाव राज्यभर जाईल यासाठी व्यवसायिक नाट्यनिर्मिती प्रयोगाचे सादरीकरण होणार असल्याची भूमिका मांडली. डॉ.हेमंत कुळकर्णी यांनी ‘संगीत संशेवकल्लोळ’ या नाटकातून निखळ मनोरंजन होणार असल्याचे सांगितले.

जुईली कलभंडे हिने वंदना सादर केली. सूत्रसंचलन अरविंद देशपांडे यांनी केले.

LEAVE A REPLY

*