Type to search

नंदुरबार

आदिवासी विकास विभागाच्या निधी वाटपाचे ऑडिट करण्याची मागणी

Share

नंदुरबार । नंदूरबार जिल्हा हा राज्यातील अतिमागास जिल्हा म्हणून ओळखला जातो,या जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी आदिवासी विकास विभागाकडून 400 ते 450 कोटी रुपये निधी वितरित करण्यात येतो,मात्र येवढा निधी खर्च करुण देखील जिल्ह्यातील मागासलेपण जैसे थे आहे.त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या निधी वाटपाचे ऑडिट व्हावे अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, नंदूरबार जिल्हा हा राज्यातील अतिमागास जिल्हा म्हणून ओळखला जातो,या जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी आदिवासी विकास विभागाकडून 400 ते 450 कोटी रुपये निधी वितरित करण्यात येतो,मात्र येवढा निधी खर्च करुण देखील जिल्ह्यातील मागासलेपण जैसे थे आहे.सर्व बाबींचा गांभीर्याने विचार केल्यावर असे लक्षात येते की या निधीचा कोणी वालीच नाही, जिल्ह्यात एवढा मोठा निधी येतो त्याचा कोणी पालकत्व स्वीकारल्यास नक्कीच सकारात्मक बदल जिल्ह्यात पहावयास मिळतील आणि जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था एका नव्या उंचीवर पोहचण्यास मदत होईल,ज्यामुळे जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांक देखील वाढेल.परंतू यासर्व बाबी आज फक्त कागदावर आहेत, आरोग्यसेवा,दळणवळण,आदिवासी जीवनमान यात काहिच विकास झाला नाही.आम्ही सर्व आदिवासी संघटना मिळुन आपणास विनंती करतो कि एका महिन्याच्या आत आपण आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या निधिचे इरीश श्रर्शींशश्र आधारावर विशेष शासकीय ऑडिट करावे.आणि त्या समितीत आमच्या पैकी एकास प्रतिनिधि म्हणून नेमाव.अन्यथा सर्व आदिवासी संघटना मिळुन आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरू अशी मागणी यावेळेस करण्यात आली.निवेदन स्थळी दिग्विजयसिंह राजपूत,अनिल वळवी,अंकुश नाईक,मोहन माळी भिल,अमर वळवी,अक्षय कोकणी,पंकज गांगुर्डे,प्रमोद पवार आदी उपस्थीत होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!