आदिवासी आश्रमशाळा शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा ; सीटु संलग्न शिक्षक कर्मचारी संघटनेनेकडून धरणे आंदोलन

0

नाशिक : आश्रमशाळांची वेळ पुर्वीप्रमाणे 11 ते 5 करण्यात यावी, सर्व बदल्या ऑनलाईन करतांना समुपदेशन करतांनाच नागपुर प्रकल्प कार्यालयाने राबविलेल्या पध्दतीचा अवलंब करावा, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना पदोन्नतीची संधी देण्यात यावी या व अशा दहापेक्षा अधिक मागण्यांवर आदिवसी आयुक्तांनी सीटूच्या पदाधिकारयाची चर्चा केली.

सीटू संलग्नीत आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ.डी.एल कराड, प्रा.बी.टी.भामरे, कॉ. एस.जे.शेवाळे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त राजीव जाधव यांच्यांशी चर्चा केली. त्यात आश्रमशाळेची वेळ 11 ते 5 करतांनाच साळुंके समितीच्या अहवालानुार जेवण आणि अल्पोपहार यातील अंतर कमी करण्याची शिफारस मान्य करून वेळेत बदल अपेक्षीत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सर्व बदल्या ऑनलाईन करणे या मागणीबाबत त्यांनी ग्रामविकास विभागाचा शासननिर्णय विचारात घ्यावा, तसेच जिल्हा परिषदेकडील सॉफटवेअर घेवून त्याप्रमाणात बदल्या ऑनलाईन राबवाव्यात अशा सूचना अपर आयुक्तांना केल्या.

कनिष्ट महाविद्यालयातील कार्यरत शिक्षकांना कोणत्याही प्रकारची पदोन्नती नाही त्यामुळे त्यांना पदोन्नती देण्याबाबत शासनाला सूचित करू अशी सूचना आयुक्तांनी केली. विविध स्तरावरील रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच 7 व्या वेतन आयोगासाठीची बैठक होणार असून त्याबाबत रिक्त पदांचा आढावा घेतला जाईल याशिवाय 3 तारखेला गृहपाल, अधिक्षक पदांची जाहिरात येणार असून त्यानंतर पुन्हा 8 तारखेला इतर संवर्गासाठी जाहीरात देणार असल्याचे त्यांनी आयुक्तांनी शिष्टमंडळाला सांगितले. शिक्षणसेवकांना नियमित वेतनश्रेणी मिळावी या मागणीवर चर्चा करतांना त्याबाबत यादी द्यावी त्यावर विचार केला जाईल.

पात्र कर्मचारयांना वरिष्ठ निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा.आश्रमशाळा स्तरावर कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारयांची सेवा 12 व 24 वर्षांपेक्षा जास्त झालेली आहे. परंतु वरिष्ठ वेतनश्रेणीस प्राप्त असूनही त्यांना लाभ दिला जात नाही. महिला शिक्षणसेवकांना शिक्षण सेवक कालावधीत 180 दिवस पूर्ण पगारी रजा मिळावी या मागणीवरही चर्चा करण्यात आली. यावेळी नियमाच्या आधीन राहून कार्यवाही केली जाईल अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

निलंबीत कर्मचारयांना चौकशीच्या अधीन राहून तीन महिन्याच्या आत कामावर घेणे, गडचिरोली प्रकल्पात लक्षांकाच्या नावाखाली रोखलेल्या वार्षिक वेतनवाढ देण्याबाबतची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

एकलव्य रेसीडेन्शीयल स्कूलमधील कर्मचारयांना 6 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी पूर्वलक्षी प्रभावाने लागू कराव्यात, पदोन्नती देतांना पात्रता, निकषांची काटेकोर नियमानुसार अंमलबजावणी व्हावी, एकाच अस्थापनेवर, एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचारयांच्या बदल्या कराव्यात, प्रतिनियुक्तया रदद करणेबाबत विचार करावा, मोफत भाडेमाफ निवासस्थान सुविधा मिळाव्यात याबाबतही निवेदन देत शिष्टमंडळाकडून चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी अप्पर आयुक्त गायकवाड, सहआयुक्त द.कृ.पानमंद, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*