आत्मा मालिकतर्ङ्गे 40 लाखाची शिष्यवृत्ती

0

कोपरगाव (प्रतिनिधी)- जंगली महाराज आश्रमाच्या आत्मा मालिक शैक्षणिक संकुल व आकाश कोचिंग इन्स्टिट्युट यांच्यावतीने या वर्षी अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 44 लाख रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा येत्या 25 जून रोजी घेतली जाणार आहे. अशी माहीती जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिली.

 

 

सदर परीक्षा 500 गुणांची असून गणित, विज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी व चालू घडामोडी या विषयांवर आधारीत घेतली जाईल. तसेच या परीक्षेचे माध्यम इंग्रजी राहणार असून निगेटीव्ह मार्किंग पध्दत राहणार नाही. आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षापासून ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे हुशार व होतकरु विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. पालकांना आर्थिक भार कमी होतो.

 

 

पहिल्या वीस क्रमांकांनी उत्तीर्ण होणार्‍या अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये याप्रमाणे बारा लाख रुपये, 21 ते 50 क्रमांकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांप्रमाणे एकूण दहा लाख व त्यापुढील दोनशे क्रमांकांसाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे एकूण दहा लाख रुपये, अशी 44 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल.

 

 

शिष्यवृत्ती परीक्षेस बसू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी या संकेत स्थळावर ऑनलाईन नावनोंदणी करायची आहे. आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठीच ही शिष्यवृत्ती योजना लागू आहे.

LEAVE A REPLY

*