आत्महत्येपूर्वी लष्करी जवान मॅथ्यूचा झाला होता छळ?

0

नाशिक : शुक्रवारी तो आमच्याशी व्यवस्थित बोलला. त्याच्या बोलण्यावरून तो कुठल्याही तणावात नसल्याचे त्याच्या भावाने जियो जोस यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे त्याचा अधिकारी किंवा वरिष्ठांकडून छळ झाला का? असा सवाल आता उपस्थित राहत आहे. काल देवळाली कॅम्प येथील एका जुन्या बराकीत रॉय मॅथ्यूचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. काही दिवसांपूर्वी रॉय मॅथ्यूने आपण आणि आपल्यासारखे अनेक जवान वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडे वैयक्तिक कामासाठी सहायक म्हणून राबत असल्याचा व्हिडिओ एका वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती.

आपल्याला अधिकाऱ्यांच्या बायका कुत्रे फिरविणे, लाँड्री करणे, मुलांना शाळेतून घरी आणणे अशा स्वरूपाची कामे सांगत असल्याचे त्याने या व्हिडिओत म्हटले होते. त्यानंतर त्याच्यावर लष्करी अधिकाऱ्यांकडून दबाव वाढत चालला होता. त्यातूनच पुढे त्याचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणी गुढ वाढले आहे.

मात्र अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कानावर हात ठेवला. तसेच त्याच्यावर कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व प्रकारामुळे भारतीय लष्करातील कारभार चव्हाट्यावर आला असून त्यातूनच रॉयचा बळी गेला का? याबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

*