Type to search

धुळे राजकीय

आता शिरपूरची प्रगती शक्य -अमरिशभाई पटेल

Share

शिरपूर । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे दिग्गज नेते यांच्या आदेशाने भाजपात प्रवेश केल्याने शिरपूरची प्रगती साधली जाईल. शिरपूर पॅटर्नचे काम, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, रोजगार, आरोग्य, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात मनापासून काम केले. मुख्यमंत्री महोदय तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील म्हणून शिरपूर साखर कारखान्याचा प्रश्न देखील मार्गी लागू शकतो. शिरपूरची आपली संस्कृती जपू या सर्वांनी मिळून तालुक्याला पुढे नेवू या. इतर तालुक्यांकडे पहा व शिरपूरकडे पहा. आपला तालुका घडविण्याचा आपण खूप प्रयत्न केला आहे. त्याबद्दल अभिमान वाटतो. राहिलेली कामे येत्या पाच वर्षांमध्ये पूर्ण होतील.तालुक्याचा विकास करण्यासाठी काशिराम पावरा यांना मोठया मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांनी केले.

भाजपा, शिवसेना, आर.पी.आय, महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ दि.17 ऑक्टोबर रोजी दहिवद येथील जाहीर सभेत अमरिशभाई पटेल हे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, जि.प.सदस्य संजय पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.सरला पाटील, हिंमतराव महाजन, लक्ष्मीकांत पाटील, भरतसिंग राजपूत, मांडळचे भटू माळी, नितीन गिरासे, मनोज धनगर, हर्षल गिरासे, प्रल्हाद पाटील, धोंडू चौधरी, व्ही.ओ.सुर्यवंशी, रोहित शेटे, विक्की चौधरी, जगन पाटील, अजमल जाधव, दाखलू गवळी, उत्तम पाटील, छगन गुजर, मुकेश पाटील, विजू सुर्यवंशी, योगेश सुर्यवंशी, सचिन चौधरी, शरद बागुल, परिसरातील सरपंच, पदाधिकारी, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, आजी माजी सरपंच, पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात सरपंच बालू चव्हाण म्हणाले की, शिरपूर पॅटर्नचे भाईंचे काम फार मोठे आहे. दहिवद परिसरातील बंधारे संपूर्ण भरल्याने पुढील पाच वर्षांची पाण्याची समस्या दुर झाली आहे.

सूत्रसंचालन भैय्या चव्हाण यांनी केले. आभार धोंडू चौधरी यांनी मानले. हेमंत पाटील म्हणाले, अमरिशभाई पटेल यांचे दूरदृष्टीने होणारे कार्य अतुलनीय असून त्यांनी केलेला तालुक्याचा विकास कोणीही नाकारु शकत नाही. तालुक्याला अजून पुढे नेण्यासाठी महायुतीला मतदान करा असे आवाहन यावेळी करण्यात आले. जि.प.सदस्य संजय पाटील म्हणाले, अमरिशभाईंनी केलेली हजारो कामे आपण कसे काय विसरु शकतो. काशिराम दादांसारखा धार्मिक माणूस आपण मोठया मनाने स्वीकारुन त्यांना तिसर्‍यांदा विधानसभेत पाठवू या. असेही आवाहन त्यांनी केले. शरद बागुल यांनीही मनोगत व्यक्त केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!