आता शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेणार, शिक्षक मंत्री विनोद तावडे यांची माहिती

0

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांमधल्या शिक्षक भरीतासाठी यापुढे परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती दिली.

“देवाण- घेवाण झाल्याशिवाय शिक्षक भरती होत नाही अशा तक्रारी आल्या होत्या. राज्यात यापुढे शिक्षक भरतीसाठी केंद्रिय पद्धतीवर परीक्षा घेतली जाईल. मेरिट लिस्टप्रमाणे रिक्त जागांवर भरती केली जाईल. पहिली ते बारावीच्या शिक्षक भरतीसाठी हा नियम लागू असेल. विनाअनुदानित जागा शिक्षणसंस्था त्यांच्या अधिकारात भरु शकतात”, असं तावडे म्हणाले.

एकूण 1 लाख 5 हजार अनुदानीत शाळा आहेत.

राज्य सरकार 57 हजार कोटी वर्षाला शिक्षणावर खर्च करते.

ओपन स्कूलची योजना राज्यभरात राबवली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येतील. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करणार.

रात्रशाळेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असंही तावडे म्हणाले.

LEAVE A REPLY

*