आता पी व्ही सिंधूचा बायोपिक; सोनू सूद करणार सिनेमाची निर्मिती

0

मिल्खा सिंग, एम.एस धोनी, मेरी कोम यांच्या आत्मचरित्रपटानंतर आता पी. व्ही सिंधूवरही आत्मचरित्रपट बनणार आहे.

या सिनेमाची निर्मिती अभिनेता सोनू सूद करणार आहे.

सिंधूची भूमिका दीपिका पदुकोण करणार असल्याची चर्चा सध्या सिनेवर्तुळात रंगत आहे. पण दीपिकाने मात्र यावर अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पण जर दीपिकाने सिंधूची भूमिका करायला होकार दिला तर तिला एका बॅटमिंटनपटूच्या भूमिकेत पाहणं तिच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असेल.

सोनूला या प्रोजेक्टबद्दल विचारले असता तो म्हणाला की, ‘अजूनपर्यंत या सिनेमाची अभिनेत्री आणि दिग्दर्शक यांची निवड करण्यात आलेली नाही. एकदा कलाकारांची निवड झाली की याबाबत सांगणे योग्य राहील.’

LEAVE A REPLY

*