आता दारुमुक्त महाराष्ट्राचे आंदोलन : तृप्ती देसाई

0

नाशिक । दि. १३ प्रतिनिधी

मंदिर प्रवेशानंतर अनेक महिला आणि पुरुषांचे अभिनंदनाचे फोन आले. मात्र प्रत्यक्षात घरात महिलांच्या बाबतीत हिंसा, छळ, मारहाण होते त्याचे काय? कोपर्डी सारखे बलात्कार होतात त्याचे काय? महिला हिंसाचाराच्या या घटना अजूनही होत असून याचे मुख्य कारण म्हणजे दारू आहे. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून दारुमुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन करणार असल्याची माहिती तृप्ती देसाई यांनी दिली.

महिलादिनानिमित्त सगुणा बहुउद्देशिय संस्था व सगुणा महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात देसाई बोलत होत्या.

trupti

पी.डी.गांगुर्डे सांस्कृतिक भवन, तपोवन लिंकरोड, जयशंकर मंगल कार्यालयाजवळ समर्थनगर येथे हा सोहळा संपन्न झाला.

सोहळ्यात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राउत, क्रीडापटू संगीता बागुल, समाजसेविका सुनीता पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

सोबतच जिल्हा परिषद सदस्य शीतल सांगळे, सीता मोरे (सामाजिक), सुहासिनी कुलकर्णी (वैद्यकीय), नलिनी क्षत्रिय (शैक्षणिक), नगरसेविका अर्चना थोरात, नगरसेविका सुषमा पगारे यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा छाया गवांदे,  प्रज्वला गांगुर्डे, जयश्री उपासनी, प्रणिता आढाव, मनिषा काळे, चंदा जाधव, वंदना नागवंशी, निशा साळवे, कीर्ती वैद्य, प्रणिता आवारे, सोनाली अहीरराव, स्मिता गायकवाड यांनी यांच्यासह परिसरातील महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

LEAVE A REPLY

*