आता चांदबिबी परत आली तरी रस्ता चुकेल

0

संग्राम जगताप, प्रभाग मॉडेलसाठी प्रयत्नशील

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहर हे खेडे आहे अशी ओळख 25 वर्षे शहराचे लोकप्रतिनिधीत्व करणार्‍यांनी करुन ठेवली होती, पण राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीने नगर शहरासह उपनगरांमधील प्रत्येक भागात विकास कामांचा डोंगर उभा केला. आता चांदबिबी जरी परत आली तरी ती रस्ता चुकेल असा विकास केला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सावेडीतील शिलाविहार जवळील ऐश्‍वर्यानगर मधील अत्याधुनिक स्ट्रीट लाईट तसेच बंद गटारपाईप योजना कामांचा प्रारंभ जगताप यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल वारे, नगरसेविका रुपालीताई वारे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, मोहटादेवी देवस्थानचे विश्‍वस्त भास्करराव सांगळे, अ‍ॅड. आंधळे, नरेंद्र बोठे, कुकडी प्रकल्प अभियंता सुभाष कोळी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, नगर शहर हे मॉडेल शहर म्हणून ओळखले जाईल असे काम आघाडीच्या नगरसेवकांकडून सुरू आहे. मी स्वत:शहर विकासासाठी भरिव निधी देऊन शहरातील प्रत्येक प्रभाग मॉडेल कसा होईल याचा प्रयत्न करित आहे.
याप्रसंगी नगरसेविका रुपालीताई वारे, बाळासाहेब पवार, भास्ककराव सांगळे, म्हस्के यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास महिला काँग्रेसचे शहर अध्यक्षा सविता मोरे, वैभव सांगळे, विनित पोकळे, अभिजित बिहाणी, श्रीनिवास कासार, सत्यम चेमटे, रुपेश यादव, प्रविण कार्ले, काकडे, गांगर्डे, शिकारे, बडे, मुंढे, दारकुंडे, भुजबळ, म्हस्के, कुलांगे, बोंदर्डे, लोळके, मिसाळ, पालवे, जाधव, जैस्वाल, टकले, धामणे, एकलहरे, क्षेत्रे, मुटकुळे, आगरवाल, तिमोणे, ठोंबरे, साळवी, फटांगरे, पोतदार, धोडके आदींसह नागरीक उपस्थित होते. सुत्रसंचालन आदमाने यांनी केले. तर रुपाली वारे यांनी आभार मानले.

नगर शहर हे एक मोठे खेडे आहे, असे नेहमीच म्हटले जाते. 25 वर्षे शहराचे लोकप्रतिनिधीत्व करणारे त्याला कारणीभूत आहेत. मात्र आम्ही ओळख पुसण्याचे काम करत आहे. शहर हे मॉडेल म्हणून नावारुपास यावे असा आमचा प्रयत्न असल्याचे सांगत जगताप यांनी राठोड यांचा नामोल्लेख टाळून शहराच्या अधोगतीला तेच कारणीभूत असल्याचा आरोप केला. 

LEAVE A REPLY

*