आता चष्म्याला करा ‘गुडबाय’

0

(आजीबाईचा बटवा)  आजकाल बदलत्या लाइफस्टाइलमुळे असं झालं की, प्रत्येक दुसऱ्या व्यक्तींच्या डोळ्यावर चष्मा लावलेला दिसतो. यामध्ये लहान मुला-मुलींचा देखील समावेश आहे.

चष्मा लागण्याचे कारण म्हणजे  अन्न धान्यामध्ये रासायनिक खतांचा अधिक मारा होय. परिणामी पोषक तत्वांचा कमतरता होय.

त्यामुळे डोळ्यांना योग्य तो रक्त प्रवाह  न झाल्याने दिवसागणिक अनेक जण या समस्येला त्रासले आहे. जर तुम्हाला चष्म्यांपासून मुक्तता हवी असेल तर खालील कृती करा.

आवश्यक सामुग्री-
– बादाम
– सौंफ
– साखर

प्रक्रिया-
बादाम, सौंफ, खाडी साखर यांचे समान मिश्रण करून पावडर तयार करणे.

दररोज रात्री एक ग्लास दुधात एक चमचा पावडर टाकून सेवन करणे. १० ते १२ दिवस हा प्रयोग केल्या नंतर तुम्हाला फरक जाणवेल. मात्र तुम्ही डायबीटीस रुग्ण असाल तर हा प्रयोग करू नका .

रोज ग्रीन टी प्या. ग्रीन टी मधील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांसाठी फायदेशीर असतात, रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या खा, याने दृष्टी सुधारण्यास नक्कीच मदत होईल, ६ ते ७ बदाम रोज रात्री भिजत ठेवा आणि सकाळी ते खा, त्रिफळा रात्री भिजवून ठेवा आणि त्याच्या पाण्याने सकाळी डोळे धुवा, अक्रोडच्या तेलाने डोळ्यांच्या चारही बाजूंना मसाज केल्याने फायदा होईल, जिरे आणि खडीसाखर यांचे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या, ३ ते ४ हिरव्या वेलची आणि एक चमचा बडीशोप एकत्र वाटून ते मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या, तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा, गाजराचा ज्यूस हा डोळ्यांसाठी गुणकारी असल्याने रोज एक ग्लास गाजराचा ज्यूस प्या.

LEAVE A REPLY

*