आता गायींची ऑनलाईन खरेदी-विक्री!

0

सरकारने घातलेली बंदी आणि स्वयंघोषित गोरक्षकांचा उच्छाद टाळण्यासाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी इंटरनेटवरील संकेतस्थळांचा वापर सुरु केला आहे.

ओएलएक्ससारख्या संकेतस्थळांवर शेकडो गायींची विक्री सुरु आहे.

50 हजार ते 2 लाख रुपयांना गायींची विक्री केली जाते आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

मागील आठवड्यात पर्यावरण मंत्रालयाने पशूंच्या आठवडी बाजारात फक्त शेतीसाठी जनावरांची खरेदी-विक्री केली जावी, असा निर्णय घेतला होता. जनावरे कत्तलखान्यात जाऊ नये, यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला होता.

LEAVE A REPLY

*