आता इमोजीपासून पासवर्ड बनवा

0

फोनसाठी पासवर्ड किती आवश्यक असतो हे वेगळं सांगायला नको.

टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिनचे अभ्यासक नवी लॉगिन सिस्टम तयार करत आहे जी इमोजीवर चालेल. म्हणजे तुम्हाला मोबाईलचा पासवर्ड अंकामध्ये तयार करावा लागणार नाही. त्याऐवजी तुम्ही एखादा इमोजी पासवर्ड म्हणून ठेवू शकतात.

आता इमोजी आपल्या रोजच्या वापरतात अनेकदा येतात. आपलं मोबाईल संभाषण पाहिलं तर त्यात शब्दाऐवजी इमोजीच जास्त दिसतील. इमोजीमुळे मोबाईलवरचा संवाद अधिक चांगल्याप्रकारे होतो असंही एका संशोधनातून समोर आलं आहे. इमोजी वापरले की नेमकं समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे किंवा त्यांच्या बोलण्याचा रोख सहज कळून येतो. तेव्हा या इमोजींना युजर्सची खूपच पसंती आहे. आता हाच फंडा वापरत नवीन पासवर्ड सिस्टिम विकसित करण्यात येणार आहे. याद्वारे मोबाईल युजर्स सांख्यिक पासवर्डऐवजी इमोजीचा पासवर्ड म्हणून वापर करू शकतात. यात हजारो प्रकारचे इमोजी उपलब्ध आहे तेव्हा युजर्सना आपल्या आवडीचे कोणतेही इमोजी निवडून त्याचा पासवर्ड तयार करता येऊ शकतो.

आणि हा पासवर्ड अधिक सुरक्षित असेल असंही म्हटलं जात आहे. पण त्याचबरोबर इमोजीचा पासवर्ड असला तर तो विसरण्याची शक्यताही कमी असेल असाही दावा करण्यात आला आहे. तेव्हा एकतर यामुळे तुमचा पासवर्ड कोणी क्रॅकही करु शकत नाही पण त्याचबरोबर लक्षात ठेवायलाही तो सोपा असेल

LEAVE A REPLY

*