..आणि महिलेच्या खूनाचे रहस्य उलगडले; प्रियकरास केली अटक

0

जुने नाशिक (प्रतिनिधी) ता. १६ : अनैतिक संबंध असलेली महिला पैसे मागत असल्याच्या रागातून डिसेंबरमध्ये तिचा खून केला. ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून टाकला.

या प्रकरणी पोलिसांनी आज मनीष रणजितसिंग गिराशे, रा. स्मिता पार्क, सातमाऊली रोड, श्रमीकनगर याला अखेर अटक केली.

सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत वासाळी शिवारात १९ डिसेंबर रोजी २५ ते ३० वयोगटातील महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला होता. चेहरा जळालेला असल्याचे ओळख पटवणे अवघड होते. तसेच तपासही आव्हानात्मक होता.

WhatsApp Image 2017-03-16 at 13.33.36

दरम्यान पोलिसांना खबऱ्यामार्फत श्रमिकनगर परिसरातील महिला अडीच महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे समजल्याने त्यांनी त्या दिशेने तपास केला असता महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले. खून झालेल्या महिलेचे नाव ज्योती मनोहर पवार असल्याचे स्पष्ट झाले.

सदर महिला विवाहित होती मात्र पतीसोबत न राहता आपला प्रियकर मनीष गिराशे याच्यासोबत मागील आठ महिन्यांपासून राहत होती. तिच्या आईशी ती संपर्कात होती. मात्र मागील अडीच महिन्यांपासून आईला काहीच फोन आला नसल्याने तिने संशय व्यक्त केला.

पोलिसांनी यासंदर्भात तपासचक्र फिरवून संशयित मनीष याच ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला. वारंवार पैसे मागत असल्याने सौ. ज्योती पवार हिचा वासाळीच्या डोंगराजवळ खून करून पेट्रोलने तिला पेटवून दिल्याची त्याने कबूली दिली.

याप्रकरणी सहा. पोलिस निरीक्षक एन. एस. पाटील अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

*