आज होलिकोत्सव पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त

0

नाशिक | दि. ११ प्रतिनिधी शहरात होलिकोत्सव अर्थात चौकाचौकांत पेटणार्‍या होळीची जय्यत तयारी शनिवारी होळीच्या पूर्वसंध्येला सुरू होती. आज शहरात विविध मंडळांच्या मोठ्या सुमारे ३२९ तसेच लहान ७४१ होळ्यांची नोंद करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष दोन्ही मिळून दीड ते दोन हजारपेक्षा अधिक होळ्या उद्या सायंकाळी पेटणार आहेत. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनीही बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

होळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घराघरांत गोडधोड केले जाते. बुधवारच्या या सणासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गोवर्‍या जमविण्यासह मोठी लाकडे जमविण्यासाठी धावपळ चालू असल्याचे आज सायंकाळी चित्र होते. मोठे लाकूड व त्याभोवती गोवर्‍या रचून होळी उभारण्याची तयारी चौकाचौकात सुरू झाली होती.

रविवारी सायंकाळी विधिवत पूजा करून होळी प्रज्वलित केली जाईल. या दरम्यान कोठे काही अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. यासाठी सुमारे ४८० अधिकारी, कर्मचार्‍यांचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तसेच त्या त्या पोलीस ठाण्यांनांच्या कर्मचार्‍यांना तैनात करण्यात आले आहे.

सोमवारी धूलिवंदनाच्या दिवशी पारंपरिक वीरांची मिरवणूक काढली जाईल. ही मिरवणूक रंगपंचमीपर्यंत चालून रंगपंचमीला गोदा घाटावर हा सोहळा पाहण्यासाठी यात्रा भरते. होळी धूलिवंदन शांततेत साजरा व्हावे, यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

शहरात १ हजारपेक्षा अधिक लहान-मोठ्या होळींची नोंद करण्यात आली आहे. प्रत्यक्ष नोंद न केलेल्या अशा दोन हजारपेक्षा अधिक होळ्या शहरात पेटविल्या जाणार आहेत.

असा राहील बंदोबस्त
निरीक्षक – ४, सहायक निरीक्षक – १२, कर्मचारी – ३६२, महिला कर्मचारी- ९०, एसआरपी तुकड्या या अतिरिक्त बंंदोबस्तासह १३ पोलीस ठाण्यांच्या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना त्यांच्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तैनात करण्यात आले आहे. त्यांच्यावर सहायक आयुक्त व उपआयुक्तांचे लक्ष असणार आहे.

१५०० मंडळांची नोंद
भद्रकाली – मोठी (५३), लहान (८७), सरकारवाडा- मोठी (३१), लहान (८२), पंचवटी – ४५ -८० , गंगापूर- २०-४० , मुंबई नाका- १५-२५, म्हसरूळ- २०-३९, आडगाव- १०-३०, इंदिरानगर- १०-५०, सातपूर- ३०- ५५, अंबड- ३०- १००, नाशिकरोड- २५-७५, उपनगर- १५- ३५, देवळाली कॅम्प- २५-४०.

LEAVE A REPLY

*