आज मुंबईत भाजपची भव्य सभा

0
केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने आज मुंबईतील षन्मुखानंद सभागृहात भाजपच्या वतिने भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह संबोधित करणार आहे.
मोदी सरकारने तीन वर्षात केलेल्या कामांवर यावेळी राजनाथ सिंह प्रकाश टाकतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील यावेळी सभेला संबोधित करणार आहेत.
हा कार्यक्रम मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखील पार पडणार आहे.
यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पुनम महाजन आणि राज्यमंत्री विद्या ठाकुर यांचीही उपस्थिती असणार आहे.

LEAVE A REPLY

*