आज इंधन खरेदी बंद

0
नाशिक | दि. ९ प्रतिनिधी – कमिशनवाढीच्या मुद्यासह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनने उद्या बुधवारपासून इंधन खरेदी बंदचा निर्णय घेतला आहे. मात्र पेट्रोलपंप सुरू राहणार असल्याचे संघटनेचे सचिव विजय ठाकरे यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून संघटना या मुद्यावर लढा देत आहे. मात्र तेल कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने खर्चात बचत करण्यासाठी असोसिएशनने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. तसेच कंपन्यांनी वारंवार याबाबत निर्णय घेण्यासाठी मुदत वाढवून मागितल्याने ही मुदत आज संपत आहे.

त्यामुळे १० मे रोजी एक दिवस खरेदी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच १४ मेनंतर दर रविवारी पेट्रोलपंप बंद राहतील. तसेच १५ मेपासून सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच पेट्रोलपंप सुरू ठेवण्यात येणार आहेत.

केंद्र शासनाने २०११ मध्ये अपूर्वा चंद्रा कमिटीची स्थापना करून पेट्रोल-डिझेल कमिशनबाबत तोडगा काढण्यात आला. वर्षातून दोनवेळा कमिशन वाढवण्याचे ठरले, मात्र तेल कंपन्यांंनी याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने असोसिएशनने खर्चात बचत करण्यासाठी पावले उचलली आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील ३५० तर शहरातील ७० पेट्रोलपंपांवर आज इंधन खरेदी केली जाणार नाही.

LEAVE A REPLY

*