Photo Gallery : आजही डिस्काउंटमध्ये वाहन खरेदीसाठी झुंबड ; अनेकांचे स्वप्न भंगले

0

नाशिक : प्रदुषणाच्या मानांकानुसार बाद झालेल्या मोटरसायकल आणि स्कूटरची स्वस्तात विक्री होत असल्याने नाशिकमध्ये ग्राहकांनी शोरुम्सला गराडा घातला असून थोड्याच वेळात शोरूमच्या बाहेर गाड्या शिल्लक नसल्याचा बोर्ड झळकल्याने मात्र अनेक ग्राहकांचे स्वस्तात गाडी घेण्याचे स्वप्न भंगले आहे.

‘बीएस-३ नो स्टॉक’ चे बोर्ड शोरुमबाहेर लावण्यात आल्याचे दिसून आले आहे. बीएस-3 वाहन विक्रीवर सुप्रीम कोर्टाने घातलेल्या बंदीनंतर वाहन विक्रेत्यांकडून या वाहनांवर बंपर सूट देण्यात आली आहे. अचानक दिलेल्या सूटमुळे बीएस-३ वाहने घेण्यासाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी कालपासून केली आहे.

बीएस-3 दुचाकींवर पाच हजारापासून 20 हजारापर्यंत तर कारवर 70 हजारापर्यंतची सूट देण्यात आली असल्यामुळे सर्वच दुकानात ग्राहकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते आहे.

 

LEAVE A REPLY

*