आजपासून रंगणार फुटबॉल विश्वचषकाच्या सेमीफायनल्स

0

सेंट पीटरबर्गस : सर्वांचं लक्ष लागून असलेल्या फिफा विश्वचषक अंतिम टप्प्यात आला असून आज पासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत. यामध्ये फ्रान्स, बेल्जीयम, क्रोएशिया व इंग्लंड संघामध्ये सेमीफायनल्स होणार आहेत .

2018 च्या फिफा विश्वचषकात शानदार कामगिरी बजावलेल्या बेल्जीयम संघाची टक्कर बलाढ्य फ्रान्स असून इकडे रोमांचक मिळवलेल्या क्रोएशियाचा सामना विजयाचा शिल्पकार असलेल्या इंग्लंड सोबत आहे.
या संघामध्ये 32 वर्षांच्या प्रतीक्षानंतर बेल्जियने उपांत्य फेरी गाठली आहे, परंतु फ्रान्स सारख्या बलाढय संघाला पराभूत करण्यासाठी त्याच्यासाठी एक कठीण आव्हान असेल.

या फिफा विश्वचषकात प्रेक्षकांना अनेक रोमांचक निकाल पाहावयास मिळाले. बलाढ्य अर्जेटिना, गतविजेत्या जर्मनी, स्पेन आणि ब्राझिल यासारख्या प्रख्यात टीम्स उपांत्य फेरीच्या लढतीतून बाहेर पडल्या आहेत.
आजपासून सुरु होणारे सामने भारतीय वेळेनुसार रात्री ११. ३० वाजेपासून खेळले जातील.

LEAVE A REPLY

*