आजपासून पोलीस भरती ; पहाटेपासून मैदानी क्षमता चाचणीला सुरुवात

0

नाशिक : जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदासाठी उद्या (दि.22) पहाटेपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. नाशिक शहर पोलीस व ग्रामीण पोलीस दलातील 169 जागांसाठी ही भरती प्रकिया राबवली जात असून यासाठी साडेसत्तावीस हजार अर्ज आले आहेत.

भरती प्रकिसाठी हजार हजार उमेदवारांचे टप्पे करण्यात आले आहेत. प्रथम धावणे यानंतर मैदानी व शाररीक क्षमता चाचण्या या टप्प्यांनुसार होणार आहेत. उद्या पहिल्याच दिवशी 1 हजार उमेदवारांना मैदानावर पाचारण करण्यात आले असून पहाटे 5 वाजेपासून मैदानी चाचणीला प्रारंभ होणार आहे. उंची आणि छातीची मोजणी झाल्यानंतर मैदानी चाचणीला उमेदवारांची निवड होणार आहे. तसेच, यावेळी शहीद चित्ते पुलापासून ते हॉटेल मिर्चीपर्यंत धावण्याची चाचणीही घेतली जाणार आहे. त्यासाठी सदरचा मार्ग सकाळी 5 ते 10 व सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत सामान्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली

नाशिक शहर पोलीसांतील शिपाईपदाच्या 79 आणि बॅण्ड पथकातील 18 जागांसाठी 14 हजार 220 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई पदाच्या 72 जागांसाठी 11 हजार 290 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यानुसार उद्यापासून प्रत्यक्ष भरतीप्रक्रियेला प्रारंभ होत आहे. त्यासाठी शहर पोलीस व ग्रामीण पोलीस दलाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार, याप्रमाणे, आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उद्या सकाळपासून मैदानी चाचणीला प्रारंभ होत आहे. त्यासाठीचीही जय्यत तयारी करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*