आजपासून दहावीची परीक्षा ; सर्व विद्यार्थ्यांना ‘दैनिक देशदूत’कडून शुभेच्छा

0

नाशिक : राज्यात आजपासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच एसएससीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. आजपासून सुरु झालेली ही परीक्षा 1 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. शैक्षणिक वाटचाल ठरवण्याच्या दृष्टीने पहिला महत्वाचा टप्पा म्हणून दहावीची परीक्षा महत्त्वाची मानली जाते.

राज्यभरातून सुमारे 17 लाख 66 हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले असून सुमारे चार हजारांहून अधिक केंद्रांवर बोर्डाची परीक्षा पार पडणार आहे.

पेपरा फुटीपासून सावध राहण्यासाठी शिक्षण मंडळाकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून पेपरफुटीचा प्रकार घडल्यास सायबर क्राईमकडे तक्रार करणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आले आहे.

सर्व केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त राहणार असून कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकदेखील केंद्रांना ऐनवेळी भेटी देणार आहेत.

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने दहावीच्या परीक्षेला सामोरे जावे, चांगले यश संपादन करावे शैक्षणिक जीवनाला कलाटणी देणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी दैनिक देशदूत आणि देशदूत डिजीटलकडून दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप खूप शुभेच्छा.

LEAVE A REPLY

*