आजपासून जीएसटीसाठी विशेष अधिवेशन

0

वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीसाठी आजपासून (शनिवार) राज्याचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन मुंबईत होणार आहे.

जीसएटी विधेयक केंद्रात मंजूर झालं असून आता राज्यात जीएसटी मंजूर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.

विरोधकांसह शिवसेनाही कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. त्यामुळे या अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधकांच्या बहिष्काराने गाजले होतं. तेव्हा हे जीएसटी अधिवेशन विरोधकांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा गाजण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे राज्यात विधेयक मंजूर करण्याचं मोठं आव्हान फडणवीस सरकारसमोर आहे.

LEAVE A REPLY

*