Type to search

जळगाव

आचारसंहिता कक्षाकडे विविध परवानगीच्या अर्जांमध्ये वाढ

Share

जळगाव । महानगरपालिकेच्या आचारसंहिता कक्षात विविध पक्षांतर्फे काढण्यात येणार्‍या रॅलीची परवानगी, प्रचारासाठी लागणारी वाहनांची परवानगी, प्रचारासाठी विविध ठिकाणी करण्यात येणारे पथनाट्यांचे आयोजनसाठी परवानगी, प्रचारासाठी लागणार्‍या वाहनांची संख्या, तसेच प्रचार व पथनाट्याकामी वापरलेले साहित्य याचा तपशील आचारसंहिता कक्षाकडे पक्षप्रमुख अथवा उमेदवाराकडून कळवणे आवश्यक आहे.

त्यावर परवानगी घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक वस्तूची, वाहनाची, जागेची संपूर्ण माहिती सादर करावी लागते. आचारसंहिता कक्षात खर्च विभाग आहे. या विभागाकडे खर्चाबाबत नोंद करावी लागते. ही नोंद असणे उमेदवरांच्या दृष्टीने आवश्यक आहे. एका उमेदवाराने मोटारसायकल रॅलीची परवानगी मागितली आहे, तर अन्य एका उमेदवाराने बैलजोडीसाठी परवानगी मागितली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!