आग लागलेल्या ट्रकमधून पळवल्या आगपेट्या

0

मनमाड : कवडी मोल भावाची वस्तू जरी असली आणि ती जर फुकटात भेटत असल्यास ती मिळविण्यासाठी कोणीही काहीही करू शकतो याची प्रचीती आज मनमाडमध्ये आली.

मनमाड मालेगाव रस्त्यावर मध्यरात्री आगपेट्या भरून निघालेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची वार्ता  वाऱ्यासारखी परिसरात पसरली. परिसरातील नागरिकांचा जत्था आला आणि आग विझलेली नसतांनासुद्धा काहींनी पेटत्या गाडीतील आगपेट्याचे बॉक्स काढून पळ काढला.

मनमाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र आग पूर्णपणे विझलेली नसताना देखील परिसरातील नागरिकांनी तसेच या मार्गावरून जाणारे वाहन धारकांनी वाहने थांबवून माचीस बॉक्सची लूट केली.

अवघ्या एक रुपयात मिळणाऱ्या आगपेटीसाठी अनेकांनी आपले जीव धोक्यात घातल्यामुळे फुकटात मिळणाऱ्या वस्तूसाठी कोणीही काहीही करू शकते याचीच प्रचीती आली.

LEAVE A REPLY

*