आगीत कार जळून खाक; चालक बचावला

0

सोनेवाडी (वार्ताहर) – कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जेकेडी हॉटेलसमोर उभ्या असलेल्या चारचाकी कारला अचानक आग लागून गाडी पूर्ण जळून खाक झाली. दैव बलवत्तर म्हणून गाडीचे चालक मालक यातून सुखरूप बचावले.

काल शनिवार दुपारी एक वाजता शिर्डी येथील लक्ष्मण महादेव सूर्यवंशी हे आपली लॉजी कंपनीची रेनाल्ड कार (एम.एच 17 ए.जे. 9603) ही गाडी स्वतः चालवित नाशिक येथे सर्व्हिसिंग करण्यासाठी घेऊन जात होते. नाशिक- शिर्डी रोडवर चांदेकसारे शिवारात जेकेडी हॉटेलसमोर त्यांनी गाडी उभी करून लघुशंका करण्यासाठी थांबले. एकूणच दोन मिनिटांत गाडीतून धूर निघू लागला. काही कळण्याच्या आत गाडीने पेट घेतला. आगीची तीव्रता जास्त प्रमाणात असल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली. दैव बलवत्तर म्हणून चालक व मालक सूर्यवंशी यातून बचावले. घटनेची माहिती कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली. आग आटोक्यात आणण्यासाठी कर्मवीर काळे कारखान्याचा अग्निशमन बंब तेथे दाखल झाला. मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. पुढील तपास पोलीस कॉन्टेबल अर्जुन बाबर करीत आहे.

LEAVE A REPLY

*