अ.भा.वि.प वर बंदी घाला ; छात्रभारतीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

0

नाशिक  : आ. प्रशांत परिचारक यांनी सैनिकांप्रती केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ एस.एफ.आय. विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई पुणे विद्यापीठात भित्तीपत्रके लावली. याचा राग येउन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एस.एफ.आयच्या विद्यार्थ्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या घटनेच्या निधेषार्थ आत छात्रभारतीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनप्रसंगी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. कारगिल संघर्षात शहीद झालेल्या कॅप्टन मनदिपसिंग यांची मुलगी गुरमेहर कौर हिने अ.भा.वि.प च्या विरूध्द लढा सुरू केला आहे. त्यामुळे तिला बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या असुन गुरमेहर कौरला पोलीस संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

तसेच एस.एफ. आयच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. गुरमेहरला धमकी देणार्‍यास तात्काळ अटक करण्यात यावी. सैनिकांच्या पत्नींप्रती वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या भाजप आ. प्रशांत परिचारक यांचा भाजपने राजीनामा घ्यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राकेश पवार, शहराध्यक्ष विशाल रणमाळे, सागर निकम, निखिल गुंजाळ, दिपक देवरे, सचिन भुसारे, रोशन वाघ, संविधान गांगुर्डे, रूपेश शार्दुल, रविंद्र गांगुर्डे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*