अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया सुरु; 37 हजार कोटींपासून बोली

0

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सहारा समूहाच्या मालकीच्या अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

सहारा समूह आपल्या गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यात अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयानं अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाचे आदेश दिले.

मुंबई-पुणे मार्गावर लोणावळा येथे टाऊनशिपतंर्गत सहारा समूहाने 10,600 एकरच्या परिसरात अॅम्बी व्हॅली वसवली आहे.

‘अॅम्बी व्हॅली’ची राखीव किंमत 37 हजार 392 कोटी रुपये ठेवत, या लिलावाला सुरुवात करण्यात येणार आहे.

मॉरिशेस स्थित रॉयल पार्टनर्स इंनव्हेसमेंट फंडने मागच्या आठवडयात अॅम्बी व्हॅलीमध्ये 10,700 कोटीच्या गुंतवणूकीची तयारी दाखवली.

सहारा समूहानुसार या प्रकल्पाचे बाजार मुल्य 1 लाख कोटीपेक्षा जास्त आहे.

 

LEAVE A REPLY

*