अहमदनगर – बदल्यासाठी जिल्हा परिषदेत शिक्षकांचे प्रतिआंदोलन

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्राथमिक शिक्षकांच्या नियमानुसार बदल्या झाल्याच पाहिजे, या मागणीसाठी शिक्षक बदली आंदोलन समितीच्यावतीने जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्यात आले. पंधरा दिवसापुर्वी शिक्षकांच्या बदल्या होवू नये यासाठी एका संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामुळे बदल्या कराव्यात का नाही? असा प्रश्‍न जिल्हा परिषद प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होवू नये यासाठी पंधरा दिवसापुर्वी एका शिक्षक गटाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चावर काढला होता. त्यानंतर शिक्षकांच्या एका गटाने शिक्षक बदली आंदोलन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी शासनाच्या धोरणानुसार बदल्या झाल्याच पाहिजे, अशी मागणी करत आमच्यावर अन्याय का? असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षीका सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

*