अहमदनगर : ईद-उल-अजहा उत्साहात

0

अहमदनगर – बकरी ईदचा सण आज नगर शहरात उत्साहात साजरा केला जात आहे.

या सणाला ईद-उल-अज़हा किंवा ईद-उज़-जुहा असेही म्हणतात.

नगर शहरातील मुस्लीम बांधवांनी इदगाह मैदानावर एकत्रितपणे नमाज अदा केली. शहर खतीब मौलाना अहेमद यांनी नमाज पठण केले.

पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मुस्लीम बांधवांना इदच्या शुभेच्छा दिल्या. जिलहिज्जा या अरबी महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईदचा सण साजरा केला जातो.

याच महिन्यात मुस्लिम लोक हज यात्रेसाठी प्रयाण करतात. मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधवांकडून बकर्‍याची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात या सणासाठी बकरी ईद हे नाव प्रचलित झाले आहे. या दिवशी मुस्लिम व्यक्ती आपल्या ऐपतीनुसार बकरे खरेदी करून त्यांची कुर्बानी देतात.

LEAVE A REPLY

*